भारतीय बॅडमिंटन पटू PV सिंधू लग्नगाठीमध्ये अडकली आहे. तिचे विवाह बंधन वेंकट दत्त साईशी जोडली गेली आहे. पारंपारिक तेलगू पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला आहे. हा विवाह सोहळा २२ डिसेंबर २०२४ रोजी उदयपूर येथे पार पडला. PV सिंधूने तिच्या लग्नाचे फोटोज तिच्या सोशल मीडिया हॅन्डलवर शेअर केला आहे. दोघांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर फार गाजत आहेत.
PV सिंधूने बांधली लग्न गाठ. (फोटो सौजन्य - Social Media )
उदयपूरच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात आणि जवळच्या काही माणसांच्या उपस्थितीत PV सिंधू आणि वेंकट दत्त साईने विवाह सोहळा उरकून घेतला आहे.
PV सिंधूने आजच तिच्या लग्नाचे काही क्षण तिच्या सर्व सोशल मीडियाच्या हॅन्डलवर शेअर केले आहेत. तसेच देशवासियांना आनंदाची बातमी दिली आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये PV सिंधू पारंपारिक वेशामध्ये दिसत असून अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळा पार पडत आहे. लग्नात फारशी गर्दी नसून अगदी काही लोकांमध्ये हा विशेष सोहळा पार पडला आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी नवं वधू वरास भरभरून आशीर्वाद दिले आहेत.
शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये होणारा अक्षदांचा वर्षाव आणि सर्वाच्या चेहऱ्यावरील आनंद त्या क्षणामध्ये असणाऱ्या उत्साहाची जाणीव करून देत आहेत.