पुणे: आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाबत खळबळजनक दावा केला आहे. ज्या जागेत राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू आहे, ती जागा संशयास्पद असून तिथे नियमांचा मोठा भंग झाल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. विजय कुंभार यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कार्यालय ‘डेक्कन शुगर’ नावाच्या एका धर्मादाय संस्थेच्या (Charitable Trust) जागेवर उभे आहे. या जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद असून, शासकीय तरतुदी धाब्यावर बसवून हे कार्यालय थाटण्यात आले आहे.
.