कर्ण महाभारतातील ते पात्र आहे, ज्याच्या शौर्याच्या गाथा इतक्या महान आहेत, जे ऐकून कुणीही त्याला हिरो मानेल. पण तुम्हाला माहिती आहे का? कर्णाला का म्हणून सूर्यपुत्र म्हंटले जाते? काय आहे कारण की कर्ण सूर्यपुत्र म्हणून ओळखला जातो?
कर्ण जन्मकथा. (फोटो सौजन्य - Social Media)
महाभारताचे युद्ध संपल्यावर नदीकाठी तीरांजली वाहताना पाची पांडवांची आई कुंती, त्या पाची भावांना त्यांच्या सहाव्या भावाची आठवण करून देते.
कर्ण स्वतः कौंतेय असतो. पण तो सूर्याचा अंश ओळखला जातो. पण कुंतीला ही पुत्रप्राप्ती झाली कधी? आणि कशी?
कुंती तारुण्यात असताना लग्नाच्या अगोदर तिला एका साधूने मंत्र दिले असते. हे मंत्र पुत्रप्राप्तीचे असते. मंत्र ठीक काम करत आहे की नाही? हे पाहण्यासाठी ती सूर्याची आराधना करून, सूर्याकडून पुत्रप्राप्ती करते.
राज्य कन्या विवाहाआधीच गर्भधारक झालेय हा विषय काही पचणारा नाही. त्यामुळे कुंती त्या सुर्यपुत्राला म्हणजेच कर्णाला वाहत्या नदीच्या प्रवाहात सोडून देते, जेणेकरून कुणाला ही गोष्ट लक्षात येऊ नये.
कर्ण वाहत-वाहत एका रथ हाकलणाऱ्या जोडप्याला सापडतो. कर्णाचा सांभाळ अधिरथ आणि राधा करतात आणि कर्ण राधेय म्हणून नावारूपास येतो.