(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘कच्चा बादाम’ या गाण्यावर डान्स करून व्हायरल झालेली अंजली अरोरा अनेक वेळा वादात सापडली आहे. आता ती एका चित्रपटात देवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिचा फर्स्ट लुक समोर आला आहे आणि तो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अंजली लवकरच येणाऱ्या ‘श्री रामायण कथा’ या चित्रपटात माता सीताची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटातून अंजलीचा पहिला लुक रिलीज झाला आहे. त्यामध्ये ती वनवासाला गेलेल्या सीतेच्या रूपात, साडी नेसून आणि हातात फळांची टोपली घेऊन दिसते.
अंजली अरोराच्या चित्रपट ‘श्री रामायण कथा’ मध्ये माता सीतेची भूमिका साकारण्यावर सोशल मिडीयावर जोरदार टीका होत आहे. काही यूजर्सनी धर्म, संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.एका युजरने लिहिले, “काय सीतेच्या नावाला बदनाम करताय?” तर दुसऱ्याने कमेंट केला, “आता कच्चा बादाम बनेल सीता.”आणखी एका युजरने विचारले, “अरे, हिला का सीता बनवलं? भारतात एवढ्या सुंदर मुली आहेत, एवढीच मिळाली का?” अंजलीच्या फोटोमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहे.
अंजली अरोरा सोशल मिडीयावरून बाहेर पडून आता म्युझिक व्हिडिओ आणि अभिनय क्षेत्रात आपली नशीब आजमावत आहे. तिचा मागील म्युझिक व्हिडिओ ‘दिल पर चलाई छुरियां’ खूप मोठा हिट झाला होता. त्यानंतर लवकरच ती ‘श्री रामायण कथा’ या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणार आहे.‘श्री रामायण कथा’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक सिंह करत आहेत आणि हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अंजली अरोडा आणि देव शर्मा यांच्या सोबत रजनीश दुग्गल, निर्भय वाधवा आणि शील वर्मा देखील दिसणार आहेत.
अंजली बद्दल बोलायचे झाले, तर ती ‘कच्चा बादाम’ या गाण्यावर डान्स करून लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तिने कंगना रनौतच्या रियालिटी शो ‘लॉकअप’ मध्ये भाग घेतला. ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे, आणि आता ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.