'या' बजेट फ्रेंडली बाईक्स म्हणजे मार्केटच्या शान! किंमत 1 लाखांपेक्षा कमी
दिवाळीच्या पाश्वभूमीवर अनेक जण नवीन घर आणि वाहनं खरेदी करत असतात. जर तुम्ही सुद्धा यंदाच्या Diwali 2025 मध्ये नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आज आपण काही उत्तम आणि स्वस्तात मस्त बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत.
TVS Raider 125 ची किंमत 80,500 ते 95,600 (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. Raider 125 ही त्याच्या सेगमेंटमधील सर्वात फीचर्स-लोडेड बाईक्सपैकी एक आहे. यात बेस व्हेरिएंटमध्ये LCD कन्सोल येतो, तर टॉप व्हेरिएंटमध्ये TFT डिस्प्ले देखील आहे. ड्युअल डिस्क ब्रेक आणि ABS असलेला एक नवीन व्हेरिएंट अलीकडेच लाँच करण्यात आला.
नवीन Hyundai Venue दिसली रे! नव्या डिझाइनसह मिळेल लेव्हल 2 ADAS फिचर, ‘या’ महिन्यात होणार लाँच
Hero Xtreme 125R ची एक्स-शोरूम किंमत 91,116 ते 94,504 दरम्यान आहे. TVS Raider ला टक्कर देण्यासाठी Hero Xtreme 125R बाजारात उतरवली असून ती खूपच आकर्षक आणि दमदार ठरते. ही बाईक वजनाने हलकी असल्यामुळे चालवायला अत्यंत सोपी आहे, ज्यामुळे दररोजचा कॉलेज किंवा ऑफिसचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आनंददायी बनतो. सेफ्टीच्या दृष्टीने यात फ्रंट व्हील ABS सुविधा देण्यात आली आहे.
या यादीतील सर्वात विश्वासार्ह बाईक म्हणजे होंडा शाइन. 78,539 ते 82,898 (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही बाईक उत्तम परफॉर्मन्स देते. याचे इंजिन अत्यंत उत्तम असल्याने कोणीही ही सहजपणे चालवू शकते. तसेच या बाईकचा मायलेज 60-65 kmpl मायलेज देते.
Land Rover Defender 110 Trophy Edition भारतात लॉन्च; स्टाइल, पॉवर आणि ॲडव्हेंचरचा ‘परफेक्ट कॉम्बो’!
Hero Glamour X 125 ही बाईक नुकतीच दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली. याची एक्स-शोरूम किंमत 82,967 ते 92,186 रुपयांपर्यंत आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी बाईक आहे, ज्यामध्ये क्रूझ कंट्रोल आहे आणि इतर अनेक प्रभावी फीचर्स देखील आहेत.
बजाज पल्सर एन125 ची किंमत 91,692 ते 93,158 (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. बजाजची नवीन पल्सर एन125 ही या सेगमेंटमधील लेटेस्ट एंट्री आहे. याचे सस्पेंशन अत्यंत आरामदायी आहे, जे सिंगल आणि डबल रायडर्ससाठी आरामदायी आहे.