फोटो सौजन्य - Social Media
भारतीय टेरीटोरियल आर्मीने (Territorial Army) माजी सैनिकांसाठी (Ex-Servicemen) भर्ती रॅली 2025 साठी अल्प अधिसूचना जाहीर केली आहे. या रॅलीत अधिकारी (Officers), कनिष्ठ अधिकारी (JCOs) आणि इतर श्रेणीतील (OR) पात्र पुरुष उमेदवारांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशभरातील विविध टेरीटोरियल आर्मी ग्रुप मुख्यालयांमध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि रॅलीचे वेळापत्रक तपासावे.
टेरीटोरियल आर्मी ही देशासाठी सेवा देणारी अर्धवेळ स्वेच्छा दल आहे, ज्यामध्ये प्रशिक्षित नागरीक आणि माजी सैनिकांचा समावेश असतो. या भरती मोहिमेचा उद्देश विविध युनिट्समधील रिक्त पदे रॅलीच्या माध्यमातून भरून काढणे आहे. अधिकृत अधिसूचना टेरीटोरियल आर्मीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवार आपल्या प्रदेशानुसार निश्चित केलेल्या तारखांना रॅलीला हजर राहू शकतात.
या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व श्रेणीतील उमेदवार — General, OBC, EWS, SC, ST आणि Ex-Servicemen यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
या भरतीअंतर्गत एकूण 716 सैनिक पदे (Soldier Posts) भरण्यात येणार आहेत. उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता पाहिली तर किमान 10वी उत्तीर्ण (Matriculation Pass) शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. किमान दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांचे एकूण वय 18 ते 42 वर्षांदरम्यान असावे. वयोमर्यादेत सवलत टेरीटोरियल आर्मीच्या नियमांनुसार पात्र उमेदवारांना लागू होईल.
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल:
1. दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
2. शारीरिक चाचणी (Physical Fitness Test)
3. लेखी परीक्षा (Written Exam)
4. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम गुणवत्तायादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
या रॅलीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह निश्चित तारखेला हजर राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि संपूर्ण वेळापत्रकासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ [www.jointerritorialarmy.gov.in](https://www.jointerritorialarmy.gov.in) ला भेट द्यावी.
ही भरती देशसेवेसाठी पुन्हा योगदान देऊ इच्छिणाऱ्या माजी सैनिकांसाठी एक उत्तम संधी आहे.