रोजच्या आहारात कायमच वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण जेवणाची वेळ चुकल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. याशिवाय अवेळी खाणे, जंक फूड खाणे, झोप न होणे, तासनतास एका जागेवर बसून राहते इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आहारात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होत नाही. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगा खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे. (फोटो सौजन्य – istock)
जाणून घ्या शेंगा खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

शेवग्याची शेंग शरीरासाठी सुपरफूड मानली जाते. कारण जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स, विटामिन ए, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम युक्त घटक शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

शेवग्याच्या शेंगांची भाजी, सूज किंवा आमटी बनवून खाल्ल्यास शरीराला सहज पचन होईल. थंडीच्या दिवसांमध्ये कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी शेवग्याच्या शेंगांपासून बनवलेले सूप प्यावे.

शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा, उष्माघात आणि शरीरसंबंधित आजारांपासून सुटका मिळते. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या आणि सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. पण त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात मोरिंगा पावडर मिक्स करून प्यायल्यास साखर नियंत्रणात राहील.

जीवनशैलीतील बदलांमुळे अपचनाच्या समस्या वाढू लागल्या आहेत. वारंवार गॅस, ऍसिडिटी आणि आतड्यांच्या समस्यांनी त्रस्त असाल तर शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे.





