नार्को को-ओर्डीनेशनची जिल्हास्तरीय बैठक (फोटो - सोशल मीडिया)
ड्रग्स विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश
तडीपारीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेश
31 डिसेंबरच्यानिमित पोलिस सतर्क
रत्नागिरी: ३१ डिसेंबर तसेच सध्याचा पर्यटनाचा हंगाम पाहता सर्वच यत्रनेने सतर्क राहून अमलीपदार्थांच्या विरोधात भरीव कारवाया कराव्यात, अशी सूचना निर्देश रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नाकों को-ओडर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
तडीपारीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा…
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारी तडीपारीची प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबव्वावी, शिक्षकांनाही सतर्क करावे, कृषी आणि वन विभागाने गांजाची लागवड होणार नाही यासाठी सतर्क रहावे. गांजा सेवन प्रकरणात, तो कुठून आणला जातो याबाबत मुळाशी जाऊन तपास करावा. जास्तीत जास्त कारवाया झाल्या पाहिजेत.
पोलिसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश
बैठकीत महामुनी यानी सविस्तर आढावा दिला, यावेळी जिल्हाधिकारी जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी महणाले की, कोस्टगार्डने बोटींची तपासणी करावी. येणाऱ्या ३१ डिसेंबर तसेच सध्याच्या पर्यटन हंगामाबाबत पोलिसांसह सर्व यंत्रणानी सतर्क राहून भरीव कारवाई करावी, पोलीसांनी पेट्रोलिंग वाढवून आपले गोपनीय नेटवर्क वाढविले पाहिजे.






