संग्रहित फोटो
शिवाजी गदादे पाटील (रा. पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नेत्याचे नाव आहे. निवडणूक आयोगाच्या निरीक्षणाअंतर्गत ललिता सुदाम तमनर (वय ४३, रा. धानोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पर्वती पायथा रोडवरील कॅनॉल पुलाजवळ, गदादे पाटील यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, टेम्पो आणि दोन रिक्षांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह, स्पीकर तसेच उमेदवार व अन्य राजकीय नेत्यांचे फोटो लावून प्रचार करण्यात येत होता. मात्र, यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम २२३ तसेच लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत कलम १२७ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, निवडणूक काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.






