देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा 79 वर्ष पूर्ण झाली आहेत. या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजतागायत अनेक वीर जवान ते स्वातंत्र्य आणि देश सुरक्षीत राहावा यासाठी प्राण पणाला लावून सीमेवर लढत असतात. याच त्यांच्या शौर्याची आणि निष्ठेची जाणीव होते ते सीमाभागातील त्यांता पराक्रम पाहून. म्हणूनच प्रत्येक भारतीयाने देशाचे सीमाभाग एकदा तरी पाहायला पाहिजे.
अटारी-वाघा सीमारेषा : भारताला लागूनच पाकिस्तानची सीमा आहे. या सीमा पंजाब, गुजरात, काश्मीर, दिल्ली अशा ठिकाणी भारत-पाकच्या सीमा आहेत. पंजाबमधील अमृतसर आणि लाहोरची सीमा म्हणजे वाघा बॉर्डर. या ठिकाणी भारतीय नागरिकांना सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत भेट देता येते. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासक्ताक दिनाच्या दिवशी या ठिकाणी शक्तीप्रदर्शन केलं जातं.
हुसैनीवाला-गंडा सिंग वाला सीमा : पंजाबच्या कसूर जिल्ह्यात हुसैनीवाला-गंडा सिंग वाला सीमा आहे. या सीमेवरुन केवळ 58 किमी अंतरावर लाहोर आहे. पंजाबच्या या ठिकाणी शहिद भगत सिंह यांचे स्मारक पाहण्यासाठी पर्यटक येत असतात.
अक्साई चीन : पाकिस्तानप्रमाणेच भारताच्या बाजूला चीनची देखील सीमा लागते. त्यातीलच एक म्हणजे अक्साई चीन. अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथून ही सीमा जवळ आहे. या ठिकाणचा भाग संवेदनशील असल्याने पर्यटकांना येथे मज्जाव केला जातो.
मुनाबाओ सीमा : भारत पाकिस्तानला आणखी एक जोडणारी सीमा म्हणजे मुनाबाओ सीमा. ही सीमा राजस्थानच्या बारमेर आणि पाकिस्तानच्या इस्लामाबाद यांना जोडते. या सीमेचं वैशिष्ट्य म्हणजे इथला गेट 12 वर्षातून एकदाच खोलले जातात.
नाथूला सीमा : भारत आणि चीनला जोडणारी दुसरी सीमा म्हणजे नाथूला सीमा. ही सीमा सिक्कीम राज्यात असून या ठिकाणाहून तिबेटचं पठार जवळ आहे. या सीमेवर भेट देण्यासाठी तुमच्या भारतीय असल्याचा पुरवा आवश्यक आहे.
सादीकी-सुलेमांकी सीमा: भारत पाकची ही सीमा असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाण दोन्ही देशाचे परेड होतात.