(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेझने २७ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियामध्ये तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत लग्न केले. ३३ वर्षीय सेलेना आणि ३७ वर्षीय बेनीने दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर हा निर्णय या कपलने घेतला आहे. या दोघांचे फोटो पाहून चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. तसेच या दोघांचे रोमँटिक फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सेलेना आणि ब्लँको २०२३ पासून रिलेशनशिपमध्ये होते
सेलेना गोमेझने २०२३ च्या अखेरीस पुष्टी केली की ती गीतकार आणि संगीतकार बेनी ब्लँकोसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. डिसेंबर २०२४ मध्ये या दोघांनी साखरपुडा केला आणि चाहत्यांना चकीत करून टाकले. तेव्हापासून, त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचे असंख्य फोटो शेअर केले होते. आता अखेर या दोघांनी लग्न करून, त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
”१००० रूपये देते, मला १० वेळा किस कर…”सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव
सेलेनाने लग्नाचे फोटो केले शेअर
सेलेना गोमेझने तिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये दोघे एकमेकांचा हात धरून प्रेमाने उभे आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये बेनी ब्लँको सेलेनाच्या मांडीवर झोपलेला आहे. तिच्या लग्नाचे फोटो शेअर करताना, सेलेना गोमेझने कॅप्शनमध्ये त्यांच्या लग्नाची तारीख लिहिली आहे, “9.27.25” असे कॅप्शन देऊन तिने हे फोटो शेअर केले आहेत. बेनी ब्लँकोने पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे, “वास्तविक जीवनात माझी पत्नी.”
सेलेना आणि ब्लँकोने त्यांची बॅचलरेट पार्टी केली साजरी
लग्नापूर्वी, सेलेना गोमेझने मेक्सिकोमध्ये तिची बॅचलरेट पार्टी साजरी केली, तर ब्लँकोने लास वेगासमध्ये त्याची बॅचलरेट पार्टी साजरी केली. २३ ऑगस्ट रोजी गायिका आणि तिच्या मैत्रिणी एका लक्झरी यॉटवर नाचताना, हसताना आणि सूर्यस्नान करताना दिसल्या. ब्लँकोने सिन सिटीमध्ये त्याच्या बॅचलरेट पार्टीचे काही झलक शेअर केले, ज्यामध्ये स्पामध्ये आराम करणे समाविष्ट होते.
Force 3 मध्ये दिसणार साउथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री, बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री!
बेनी ब्लँको कोण आहे?
सेलेनाचे पती बेनी ब्लँको हे एक अमेरिकन गीतकार, रेकॉर्ड निर्माता आणि संगीतकार आहेत. ८ मार्च १९८८ रोजी व्हर्जिनिया येथे जन्मलेल्या बेनी यांनी एड शीरन, जस्टिन बीबर, खालिद, हॅल्सी, केटी पेरी आणि रिहाना यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. बेनी त्यांच्या उत्कृष्ट गीतलेखन आणि निर्मिती कौशल्यासाठी ओळखले जातात. लेखन आणि निर्मिती व्यतिरिक्त, त्यांनी अनेक एकल अल्बम रिलीज केले आहेत.