भारताचा संघ आज बार्बाडोसला पोहोचला आहे. टीम इंडिया बार्बाडोसमध्ये पोहोचताच बीसीसीआयने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे. भारताच्या संघाचा पहिला सुपर-८ चा सामना २० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सरावासाठी भारताच्या संघासाठी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भारताचे खेळाडू शर्टलेस व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत.
फोटो सौजन्य - बीसीसीआय

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नाचताना आणि मजा करताना दिसत आहे. त्याचबरोबर विराटची साथ रिंकू सिंहने दिली.

भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो सुद्धा बार्बाडोसमध्ये भारतीय क्रिकेट संघातील मित्र परिवारासोबत मजा मस्ती करताना दिसला.

रिंकू सिंह हा त्याच्या फलंदाजीमुळे आणि फिनिशर म्हणून ओळखलं जातो. त्याचबरोबर तो मजेशीर बोलीमुळे सुद्धा त्याला लोक पसंत करतात. रिंकू बार्बाडोस विराटसोबत मज्जा करताना दिसला.

विश्वचषकामध्ये भारताचा संघ चांगल्या लयीत दिसला आहे. बार्बाडोसचा हा टीम इंडियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली नाचताना दिसला. सध्या विश्वचषकामध्ये विराट कोहलीने अजुनपर्यत मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी झाला नाही.






