सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरू असून वेगवेगळ्या पेहरावात सर्वांना पाहायला मिळत आहे. वर आणि वधूसह सर्वच डिझाईनर कपड्यांमध्ये दिसून येत आहे. यामध्ये सर्वात जास्त तोरा मिरवतेय ती म्हणजे नणंदबाई ईशा अंबानी. नुकतेच राधिका - अनंतच्या हळदीला ईशाने केलेला लुक व्हायरल होतोय. डिझाईनर तरूण तेहलियानीने डिझाईन केलेल्या लेहंग्यामधी ईशाचा लुक पाहा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ईशाने यावेळी क्लासी आणि एलिगंट अशा लुक केला असून यावेळी तिचा लुक डिझाईनर तरूण तहलियानी यांनी डिझाईन केला होता
ईशाने यावेळी हँडक्राफ्टेड लेहंगा घातला असून त्यावर संपूर्णकतः जरदौसी वर्क करण्यात आले होते
दाक्षिणात्य फॅशनचा आधार घेत ईशाने यावेळी दुसरा लुक केला होता. तिचा हा आकर्षक लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
लाईट ब्लू आणि बिज कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ईशाचा लुक खूपच लक्षवेधी आणि मनमोहक दिसून येतोय
यासह ईशाने पाचूचे दागिने मॅच केले असून हिऱ्यांचा कंबरपट्टादेखील लावला आहे आणि पुन्हा एकदा उत्तम फॅशनचे समीकरण दाखवून दिले आहे
यावेळी दाक्षिणात्य पद्धतीची हेअरस्टाईल केली असून श्रीदेवीचा लुक तिच्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरेसमोर आलाय