उत्तराखंडातील केदारनाथ मंदिर हे जगभर प्रसिद्ध आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रातही असेच एक रहस्यमयी शिवमंदिर आहे. गुहेच्या आत दडलेल्या या मंदिराचे नाव केदारेश्वर गुहा मंदिर असे आहे. या गुहेत कमरेइतके पाणी असून या पाण्यात हे शिवलिंग आहे. या गुहेतील पाणी फार थंड असल्याकारणाने या शिवलिंगापर्यंत पोहचणे काही सोपे काम नाही. चला याविषयी काही रंजक बाबी जाणून घेऊयात.
महाराष्ट्रातील केदारनाथ! घनदाट जंगलात गुहेच्या आत लपलंय रहस्यमयी मंदिर, जगाच्या विनाशाचे संकेत देणार
महाराष्ट्रातील हे रहस्यमयी मंदिर घनदाट जंगलात, गुहेच्या आत आणि विशेष म्हणजे, एका खांब्यावर उभे आहे. मंदिरातील शिवलिंग सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे
या मंदिराच्या आत 5 फूट म्हणजेच व्यक्तीच्या कमरेपर्यंत येईल इतके पाणी आहे. मळगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र नदीच्या काठावर हे मंदिर आहे
नदीचे पाणी थेट मंदिरात शिरते. मंदिराच्या अरुंद प्रवेशद्वाराच्या पलीकडे गुहेचे एक रमणीय दृश्य दिसते. गुहेतील या मंदिरात एक स्वयंप्रकट शिवलिंग आहे
वास्तुकलेचा एक उत्तम नमुणा म्हणून आपण या मंदिराकडे बघू शकतो. हे मंदिर चार खांबांच्या मध्ये उभे होते. मात्र, आता यातील तीन खांब तुटले असून केवळ एका खांबावर हे मंदिर उभे आहे
अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या हरिश्चंद्र गडावर हे अनोखे मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे
मंदिरात असलेल्या या चार खांबांचा सखोल अर्थ आहे. सत्य, त्रेता ,द्वापार आणि कलियुग या चार युगांचे प्रतीक म्हणून हे चार खांब आहेत. सध्या या चार खांबापैकी फक्त एक खांब उभा आहे
हा उरलेला एक खांब जर पडला तर जगाचा नाश होईल अशी धारणा आहे. हे महाराष्ट्रातील असे एकमेव मंदिर आहे, जे जगाच्या विनाशाचे संकेत देणार आहे