महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अनेक स्थानिक गोष्टी प्रसिद्ध आहेत. पण जर तुम्ही कोकणच्या वाटेला जाल तर तेथील कथांनी अंगी घामाच्या धारा नक्की सुटतील. अंगात थरार सोडणारे तेथील कथा अतिशय भयंकर आहेत आणि या कथा ऐकण्याची खरी मज्जाही कोकणातच आणि तेही भररात्री! 'मुंज्या' तर ऐकूनच असाल. या भुताच्या प्रकारावर सिनेमा पण आला होता.
'मुंज्या' जिथे दिसेल तिथून पळत सुटा. (फोटो सौजन्य - Social Media)
कोकणातील प्रसिद्ध भूत म्हणजे 'मुंज्या'. ब्राह्मण समाजात ६ ते ७ वर्षीय बाळाचे मुंज संस्कार करण्यात येते. मुंज करताना त्या मुलाचे मुंडन केले जाते. मुळात, हा भुताटकीच्या प्रकार या संस्काराशीच जोडलेला आहे.
एखाद्या मुलावर हे संस्कार करण्यात आले आणि जर तो मुलगा पुढील १० दिवसांत मृत झाला तर त्याच्या आत्म्याचे रूपांतर ब्रह्मराक्षस म्हणून होते.
यालाच मुंज्या असे संबोधले जाते. मुंज्या भटकण्याचे कारण म्हणजे त्याची तीव्र इच्छा. आपल्या राहिलेल्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी मुंज्या भटकतो.
असे म्हंटले जाते की, मुंज्या पिंपळाच्या झाड्यावर तसेच विहिरीवर वास्तव्य करतो. हा भुताटकीच्या प्रकार खूप चतुर आणि हुशार मानला जातो.
रात्रीच्या वेळी झाडांवर वास्तव्य करणाऱ्या मुंज्यावर 'मुंज्या' नावाचा नुकतीच प्रसिद्ध झालेला सिनेमा उपलब्ध आहे.