मागील काही महिन्यांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे. सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वच महिला आर्टिफिशियल दागिने परिधान करतात. आर्टिफिशियल दागिन्यांची मोठी क्रेझ वाढली आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या दिवशी सोन्याच्या नाजूक दागिन्यांसोबतच आर्टिफिशियल दागिने सुद्धा परिधान केले जातात. आर्टिफिशियल दागिने अतिशय कमीत कमी पैशांमध्ये मिळून देतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे वाटी मंगळसूत्र उपलब्ध झाले आहे. यामुळे साडीवर लुक अतिशय खुलून दिसतो. विवाहित महिला प्रत्येक सणाच्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र परिधान करतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
गौरी-गणपतीच्या सणांसाठी बनवा 'या 'आकर्षक पॅटर्नचे वाटी मंगळसूत्र
आर्टिफिशियल दागिने १००० पासून ते अगदी ३००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही कॉटन साडी किंवा ड्रेसवर परिधान करण्यासाठी या डिझाईनचे मंगळसूत्र निवडू शकता.
सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक महिला १ ग्रॅम सोन्याचे दागिने परिधान करतात. त्यामुळे साऊथ इंडियन डिझाईनचे मंगळसूत्र विकत घेऊ शकता.
काहींना डिझायनर लाल,पांढरे, मोत्यांचे किंवा गुलाबी स्टोन्सपासून बनवलेले पेटेंट मंगळसूत्रामध्ये घालायला खूप जास्त आवडतात. या डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही डिझायनर साडीवर घालू शकता.
गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही या डिझाईनचे सुंदर मंगळसूत्र घालू शकता. बारीक वाट्या आणि काळ्या मण्यांची गुंफण करून बनवलेले मंगळसूत्र साडीवर अतिशय सुंदर दिसतात.
हल्ली सर्वच मुलींना वाटी मंगळसूत्र घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही ड्रेस किंवा साडी घातल्यानंतर या डिझाईनचे सुंदर मंगळसूत्र घालू शकता.