काही वर्षांपासून भारतामध्ये देखील एका नावाने थैमान घातले होते, ते म्हणजे 'ब्लडी मेरी'. अनेक भारतीय युटूबर 'ब्लडी मेरी चॅलेंज' नावाचा चॅलेंज स्वीकारत होते. त्यातील काही जणांनी या आभासाचा सामना केला आहे असे अनेक युटूबर्सचे म्हणणे आहे. असे म्हणतात कि 'ब्लडी मेरी' एक प्रेतात्मा आहे. जो कुणी 'ब्लडी मेरी' या नावाला तीनदा उच्चारतो त्याला चित्रविचित्र अनुभव मिळण्यास सुरुवात होतात.
रात्री अंधारात हातात मेणबत्ती घेऊन आरशासमोर कधीच 'हे' नाव उच्चारू नका. (फोटो सौजन्य - Social Media)
काही लोकांच्या मते, 'ब्लडी मेरी' एक भयंकर आणि विक्षिप्त आत्मा आहे, जी प्रतिशोध घेण्यासाठी व्यक्तींना दिसते, तर काही लोकं याला निव्वळ कथा आणि अफवा म्हणून पाहतात.
पाश्चात्य संस्कृतीत 'ब्लडी मेरी' या नावाने अनेक प्राचीन कथा ऐकण्यास मिळतात. काही जणांच्या मते ब्लडी मेरी एक अत्याचारी महिला होती, जी मृत्यूनंतर ती वाईट आत्मा म्हणून वावरत आहे.
ब्लडी मेरीची कथा अनेक चित्रपटांमध्ये दर्शवली गेली आहे. लोकांच्या मनात 'ब्लडी मेरी' नावाची भीती तयार करण्यामागे चित्रपटांचा फार मोठा हात आहे.
काही कथा असे सांगतात कि ती एक निर्दोष महिला होती जी अन्यायकारकपणे दडपली गेली आणि त्यानंतर तिचा आत्मा संतापलेला आहे तर काही तिला अत्याचारी म्हणतात.
ब्लडी मेरीला अनेकदा व्हॅम्पायर या नावाने ओळखले जाते. काही लोकांच्या मते, ब्लडी मेरी एका प्रकारचा मरणानंतरही जिवंत असलेली आत्मा आहे जी केवळ मृत्यू घेण्यासाठी वावरते.