काल ७ सप्टेंबरच्या रात्री भारतासरह जगभरातील अनेक देशांमध्ये महत्त्वपूर्ण खगोलीय घटना घडली. लोकांनी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण पाहण्याचा अनुभव घेतला. यावेळेचे चंद्रग्रहण हे अत्यंत खास होते. कारण यावेळी लोकांना चंद्र रक्तासारखा लाला पाहायला मिळाला. याला ब्लड मून असे म्हटले जाते. सुमारे ८०मिनिटे हे दृश्य दिसले. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि मध्य पूर्वेच्या देशात ब्लड मूनचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. यातील काही दृश्यांचे फोटो आपण पाहूयात.
Lunar Eclipse 7 september in India and other countries see photos
भारतीय वेळेनुसार, ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता चंद्रग्रहण सुरु झाले होते ते ३.३० पर्यंत चालले. यावेळी भारताच्या 'अशोक स्तंभ' (Pillar Of Ashoka)च्या मागे चंद्राचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम/choudharyravi)
पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील मिशीदीच्या मिनारमधून 'ब्लड मून' चे अद्भुत असे दृश्य दिसले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कोलकाता येथील स्वातंत्र्यसैनिक सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यामागे देखील ब्लड मूनचा अद्भुत नजारा पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तसेच पश्चिम आशियातील सागरी किनारी वसलेला देश इस्रायलमध्येही ब्लड मूनचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले. यावेळी चंद्र थोडासा लाल-पिवळसर असा पाहायला मिळाला(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तर रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे पूर्ण चंद्रग्रहण होतानाचे दृश्य पाहायला मिळाले. यावेळी चंद्र थोडासा पिवळसर आणि लाल होताना दिसला. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
याशिवाय चंद्रग्रहणादरम्यान युएईमधील बुर्ज खलिफावर ब्लड मून चमकताना दिसला. यावेळी चंद्र लाल बिंदूसारखा दिसून आला. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)