फोटो सौजन्य - Proteas Men
India vs South africa Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर 8 चा तिसरा सामना खेळवला जात आहे. भारताचे संघाने पावर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली पण त्यानंतर डेव्होल्ड ब्रेविस आणि डेविड मिलर या दोघांची जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिला इनिंग मध्ये सात विकेट्स गमावून 187 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे.
दक्षिण आफ्रिका चार ओव्हर मध्ये तीन विकेट कमावल्यानंतर या दोघांचे महत्त्वाचे भागीदारी आली आणि त्यांनी संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर एडन मार्करम याने संघासाठी चार धावा केल्या आणि त्यानंतर अर्शदीप सिंग याने त्याला पवेलियनचा रस्ता दाखवला. तर क्विंटन डीकॉक याला जसप्रीत बुमराहने बाद केले.
रायन रिकल्टन याने 7 धावा करून विकेट गमावला. डेवोल्ड ब्रेव्हिस याने संघासाठी 45 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. वरुण चक्रवर्तीने मिलरला बाद केले, तो ६३ धावांवर बाद झाला. मार्को जॅन्सन आता फलंदाजीसाठी आला आहे आणि स्टब्ससोबत खेळेल. दक्षिण आफ्रिकेने १६ षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या आहेत. डेविड मिलर याने दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी कमालीची कामगिरी केली, अर्शदीप सिंह याने ४ ओव्हरमध्ये 2 विकेट्स नावावर केले तर वरूण चक्रवर्ती आज महागडा ठरला त्याने 1 विकेट घेतला. तर जसप्रीत बुमराहने संघाला 3 विकेट्स मिळवून दिले.
Innings Break!#TeamIndia have been set a target of 188. 🎯 Chase on the other side ⏳ Scorecard ▶️ https://t.co/ZE8J4fF18z#T20WorldCup | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/halaNIMltw — BCCI (@BCCI) February 22, 2026
डेव्हिड मिलरने अर्धशतक झळकावले, ३५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावा केल्या. डी वॉल्ड ब्रेव्हिसने २९ चेंडूत ४५ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स ४४ धावांवर नाबाद राहिला. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात २० धावा दिल्या. कॉर्बिन बॉश ६ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का बसला.






