लहान मुलांसाठी नाश्त्यात 'या' पदार्थांपासून बनवा पराठे
लहान मुलांना बटाटा खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे मुलांच्या नाश्त्यासाठी तुम्ही त्यांना आलू पराठा बनवून खाण्यास देऊ शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मटारपासून कायमच टिक्की किंवा कबाब बनवण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मटार पराठा बनवू शकता. हा पदार्थ दह्यासोबत चविष्ट लागतो.
मेथीची भाजी शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. कडू मेथी खायला लहान मुलांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे मेथीपासून मुलांच्या नाश्त्यात मेथी पराठा बनवावा. मेथीमध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येते.
लोहयुक्त बीट चवीसोबत शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहेत. नियमित बीट खाल्यास शरीरात कधीही रक्ताची कमतरता निर्माण होणार नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी बीट पराठा बनवू शकता.
लहान मुलांना गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे मुलांसाठी तुम्ही मलाई पराठा बनवू शकता. साखर आणि मलाईचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला सुंदर लागतो.