मखाणा खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि पौष्टिक आहे. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर अनेक लोक मखाणा चाट किंवा मखणांपासुन बनवलेले पदार्थ खातात. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर आणि मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात. मखाणा खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात, असे मानले जाते. पण काहींच्या आरोग्यासाठी मखाणा घातक ठरू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात मखाणाचे आहारात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मखाणाचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचू शकते. (फोटो सौजन्य – istock)
'या' लोकांच्या आरोग्यासाठी मखाणा ठरेल धोक्याचे
मखाणामध्ये कॅल्शियम आणि ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोनच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मखाणा खाऊ नये. ऑक्सलेट असलेले अन्नपदार्थ जास्त खाल्ल्याने स्टोनची समस्या आणखीनच वाढू लागते.
हल्ली रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शरीराचा रक्तदाब कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. यामध्ये असलेले पोटॅशियम आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते.
गॅस, आम्लता किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम इत्यादी समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात मखाणा अजिबात खाऊ नये. यामुळे पोट फुगणे किंवा पोटात गॅस वाढू शकतो.
रक्त पातळ करण्याचे औषध घेणाऱ्यांसाठी जास्त प्रमाणात मखाणा खाणे शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे असे कोणतेही औषध घेत असलेल्या लोकांनी मखाणा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काहींना मखणाच्या बिया खाल्ल्यानंतर खाज सुटणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोटदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरास पचन होणाऱ्या आणि सूट होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.