मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Siraj reveals his plan for West Indies batsmen: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथे ०२ ऑक्टोबरपासून खेळली जात आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत केवळ १६२ धावाच करू शकला. भारतीय गोलंदाजांसमोर एकही कॅरिबियन फलंदाज टिकू शकला नाही. या सामन्यात मभारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेऊन शानदार गोलंदाजी केली. तर बूमराह आणि कुलदीप या जोडीने त्याला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चार बळी घेणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सांगितले की, दीर्घ विश्रांतीनंतर हिरव्या विकेटवर गोलंदाजी करणे त्याला चांगले वाटले.
मागील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-२ च्या बरोबरीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सिराजने ४० धावांत चार बळी घेत आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ ४४.१ षटकांत १६२ धावांवरच गारद झाला. तर पहिल्या दिवसाअखेर भारताने पहिल्या डावात २ बाद १२१ धावा केल्या होत्या.
पहिल्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीनंतर मोहम्मद सिराजने सांगितले की, हिरव्या विकेटवर गोलंदाजी करण्यास तो उत्सुक असून भारतात कसोटी क्रिकेटमध्ये अशा विकेट सहसा उपलब्ध होत नसतात. मागील वेळी न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरूमध्ये अशी विकेट उपलब्ध झाली होती. तेव्हा मी आता त्यावर गोलंदाजी करण्यास खूप उत्सुक आहे. कसोटीपूर्वी खेळपट्टीवर भरपूर गवत होते, जे कापण्यात आले होते. परंतु नवीन चेंडू अजून देखील मदत करत आहे.
मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसला एका शानदार चेंडूवर माघारी पाठवले आहे, सिराज म्हणाला की, “वॉबल सीम (हवेत फिरणारा चेंडू) वापरून, तो आत येईल की बाहेर येईल हे सांगता येणार नाही. मी वॉबल सीम टाकला, पण तो थेट चमकदार बाजूने जाऊन पोहचला.” सिराजने हे देखील कबूल केले की घरच्या मैदानावर इंग्लंडसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
हेही वाचा : ILT20 मध्ये कुणी भाव दिला नाही! आता अश्विनने घेतला मोठा निर्णय; BBLमध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार संपूर्ण हंगाम
मोहम्मद सिराज म्हणाला की, “इंग्लंडमधील मालिका खूप स्पर्धात्मक राहिली होती आणि तिथे माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला. एका मजबूत संघाविरुद्ध चांगले खेळल्याने मला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास मिळाला आणि आज मला ते जाणवत आहे. मी तीन आठवड्यांचा ब्रेक घेतला आणि नंतर पुन्हा सरावाला सुरुवात केली. मी इंडिया अ संघाकडून खेळलो. दीर्घ विश्रांतीनंतर खेळल्याने तुम्हाला तुमची लय सापडण्यास मोठी मदत होते.”