मलायका अरोरा नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. वयाच्या ५१ व्या वर्षीही तिच्या अदा आणि तिचा नखरा पाहून तरूणही थक्क होतात. मलायकाची स्टाईल ही क्लासी आणि किल्लर असते. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपल्या विविध स्टाईलमधील फोटो पोस्ट करत असते. फॅशनच्या बाबतीत, मलायका अरोरा तिच्या लुकसह विविध प्रयोग करत असते. पारंपारिक असो किंवा पाश्चात्य पोशाख, ती कोणताही पोशाख परिपूर्णतेने परिधान करू शकते. नुकतेच तिने ‘सुपरडान्सर विरूद्ध इंडियाज बेस्ट डान्सरच्या’ फिनालेसाठी केलेली स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेतेय (फोटो सौजन्य - Malaika Arora Instagram)
मलायका तिच्या स्टाईलसह वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. तिने ब्लॅक पँटसूटसह केलेला हा लुक सध्या चर्चेचा विषय झालाय. कसा आहे तिचा हा स्टायलिश लुक करूया डिकोड

डिझाईनर मंदिरा रिकने हा ड्रेस डिझाईन केला असून मलायकाने नेहमीच्या सहजतेने हा पँटसूट कॅरी केला आहे. मलायका काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसत आहे ज्यामध्ये डीप नेकलाइन ठेवली असून अत्यंत क्लासीरित्या सांभाळले आहे

ब्राऊन शेडच्या केसांना वेव्ही लुक देत मलायकाने या संपूर्ण ब्लॅक ड्रेससह परफेक्ट मॅच केले आहे. तिच्या ब्लेझरमध्ये पॅडेड स्लीव्हजदेखील लावण्यात आले आहेत ज्याच्या एका स्लीव्हमध्ये काळ्या गुलाबाचे मोठे डिझाईन करण्यात आले आहे

मलायकाने यासह गळ्यात मोत्याचा पाचू गुंफलेला तीन थरांचा नेकलेस परिधान केला असून एक गोल्डन नेकलेसही घातला आहे तो तिच्या डीप नेकलाईनमध्ये परफेक्ट बसला आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतोय

यासह पाचूचे मोठे कानातले आणि हातात पाचूची अंगठी घालत तिने या लुकला परिपूर्ण केले आहे आणि याशिवाय न्यूड रंगाचे नेलपेंट लावल्यानेही तिच्याकडे लक्ष वेधले जात आहे

(फोटो सौजन्य - x अकाउंट)






