(फोटो सौजन्य: Instagram)
द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…
ड्रीम वेडिंगसाठी खास निवडलेली प्रॉपर्टी
लग्न समारंभासाठी ITC Mementos Udaipur या लक्झरी रिसॉर्टची निवड करण्यात आली आहे. उदयपूर शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेले हे हॉटेल निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. जंगलाच्या सान्निध्यात आणि अरावली पर्वतरांगांच्या कुशीत असलेली ही प्रॉपर्टी रॉयल अनुभव देणारी आहे. याशिवाय लग्नातील काही कार्यक्रम Raffles Udaipur आणि Fairmont Udaipur Palace येथे पार पडणार असल्याची माहिती आहे.
106 एकरांमध्ये पसरलेले वैभव
ITC मेमेंटोस हे सुमारे 106 एकर परिसरात विस्तारलेले आहे. येथे 117 पेक्षा अधिक सूट्स आणि व्हिला उपलब्ध आहेत. प्रशस्त बॉलरूम्स, मोठे आउटडोअर लॉन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट स्पेसेस असल्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य मानले जाते. हॉटेलमधील सर्वात आलिशान ग्रँड प्रेसिडेन्शियल सूट विशेष आकर्षण ठरतो. या सूटमध्ये ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण, खासगी गार्डन, प्रायव्हेट पूल, तसेच उच्च दर्जाच्या सुरक्षा सुविधा दिल्या जातात. या सूटचा एका रात्रीचा खर्च साधारण दोन लाख रुपयांपासून सुरू होतो, अशी माहिती समोर आली आहे.
खोल्यांचे दरही तितकेच आकर्षक
या हॉटेलमधील सामान्य खोलीसाठी साधारण 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. पाहुण्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये व्हॅली व्ह्यू व्हिला, लेक व्ह्यू व्हिला, प्रीमियम व्हिला, अरावली सूट आणि मेमेंटोस सूट यांचा समावेश आहे. तसेच प्रेसिडेन्शियल आणि ग्रँड प्रेसिडेन्शियल सूट्सही उपलब्ध आहेत.
खोल्यांचे अंदाजे दर पुढीलप्रमाणे आहेत:
स्टार कपलची संपत्ती
रश्मिका आणि विजय यांनी दक्षिण भारतीय तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोघांचीही तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता आहे. या भव्य लग्नसमारंभासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती सुमारे 66 कोटी रुपये आहे, तर विजय देवरकोंडाची नेटवर्थ अंदाजे 50 ते 70 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.






