
आनंदाचा उत्साह, दुःखाच्या किंचाळीत बदलला! झिपलाइन वायर तुटली अन् मनालीत 12 वर्षांची मुलगी 30 फुटाच्या दरीत कोसळली; Video Viral
हिमाचल प्रदेशातील मनाली हे ठिकाण फिरण्यासाठीचे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी मे आणि जून महिन्यामध्ये इथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. सुंदर वातावरणासहच इथे अनेक उपक्रमांचाही आनंद घेतला जातो. अशातच आता एक धक्कादायक घटना मनालीतून समोर आली आहे. साहसी खेळाचा आनंद लुटत असतानाच मुलीसोबत नको ती घटना घडते आणि ती थेट खोल दरीत जाऊन कोसळते. तिच्या सोबत घडलेल्या या अपघातामुळे आजूबाजूच्या परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले असून या मुलीचे वय फक्त १२ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
खोल दरीच्या वर दोरीला लटकत मुलगी ही खोल दरी पार करत होती. पण असं करत असतानाच तिच्या झिपलाइनचा केबल अचानक मध्यभागून तुटते ज्यामुळे ती काही क्षणातच खोल दरीत कोसळली जाते. मुलीचे नाव त्रिशा असून तिला या घटनेनंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिची प्रकृती चिंताजनक आहे. त्रिशाला फ्रॅक्चर झाले आहे, काही दिवसांपूर्वीच तिच्या शस्त्रक्रिया करण्यात आली ज्यानंतर आता ती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबाचा आरोप आहे की झिपलाइनिंग साइटवर अपुरी सुरक्षा उपाययोजना होत्या आणि अपघातानंतर त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिशा बाजवे तिच्या कुटुंबासह मनाली येथे सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. इथे ती साहसी खेळाचा आनंद लुटत असताना अचानक तिच्या हार्नेसला जोडलेली दोरी तुटली आणि तिच्यासोबत भयंकर अपघात घडला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये मुलगी खाली खोल दरीत कोसळताना दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ @Loves839 नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात असून ही घटना पर्यटनस्थळांवर असणाऱ्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.