दूध आरोग्यदायी फायदेशीर आहे. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. दूधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलशियम असते. तुम्हाला माहित आहे का, दुधापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात. त्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या.
फोटो सौजन्य सोशल मिडिया

दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन Dअसते, हाडे आणि दात मजबूत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. दूध हे उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहे, जे स्नायूंची निर्मिती आणि शरीरातील ऊतींची दुरुस्ती करण्यास मदत करते.

पनीर - यात भरपूर प्रथिने आणि कॅल्शियम असते, जे स्नायूंची वाढ व दुरुस्ती करतात. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा हा उत्तम स्रोत आहे.

दही - यात प्रोबायोटिक्स (उपयुक्त जिवाणू) असतात, जे पचनक्रिया सुधारतात. पोटाच्या आरोग्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

ताक- जेवणानंतर ताक प्यायल्यास अन्न लवकर पचते आणि अॅसिडिटी होत नाही. शरीराला हायड्रेट ठेवते आणि उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण करते. कॅलरी कमी असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

तूप- फायदे यात चांगल्या दर्जाचे फॅट्स आणि व्हिटॅमिन ए, डी, ई असतात. सांध्यांचेंगंग वंगण (lubrication) वाढवून हाडे लवचिक ठेवतात. स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते.

चीज - फायदे: कॅल्शियम, प्रथिने आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. हाडांची घनता वाढवण्यास आणि दातांचे क्षय रोखण्यास मदत करते.






