केस ओढले, फरपटत नेलं अन्.... ; इस्रायली कोठडीत स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Hamas War : जेरुसेलम : सध्या इस्रायल आणि हमास युद्ध (Israel Hamas War) थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यासाठी २० कलमी योजना मांडली आहे. याला इस्रायलने सहमती दर्शवली आहे, मात्र अद्याप हमासची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. हमासने केवळ ओलिसांच्या सुटकेची अट मान्य केली आहे. यामुळे ट्रम्प यांनी हमासला आज संध्याकाळी सहापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. याच युद्धबंदीच्या प्रयत्नांदरम्यान एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग इस्रायलच्या ताब्यात असून तिच्यासोबत इस्रायली सैन्याने गैरवर्तने केल्याचा प्रकार समोर आला आहे. गाझाकडे मदत घेऊन निघालेल्या ग्लोबल फ्लोटिलाला इस्रायलने अडवले होते. या बोटीवर १३७ कार्यकर्त्ये होते. या सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर मोठा वाद सुरु झाला होता. शनिवारी (०४ ऑक्टोबर) या सर्वांना तुर्कीला पाठवण्यात आले. पण त्याआधी ग्रेटासोबत असलेल्या कार्यकर्त्याने एक खळबळजनक दावा केला. त्याने सांगितले की, इस्रायली सैन्याने ग्रेटाला क्रूर आणि भयावह वागणूक दिली.
‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
कार्यकर्त्याने आरोप केला की, इस्रायली सुरक्षा दलांनी ग्रेटासोबत अमानवीय वर्तन केले. तिला केसांना ओढण्यात आले, फरपटत नेण्यात आले आणि जबरदस्तीने तिला इस्रायली झेंडाचे चूंबन घेण्यास भाग पाडले. तिला अपमानजनक वागणूक देण्यात आली. केवळ तिच्यासोबतच नव्हे तर इस्रायलच्या ताब्यात असलेल्या इतर कार्यकर्त्यांसोबतही प्राण्यांप्रमाणे वागणूक देण्यात आले असल्याचे, मलेशियाची एक्टिव्हिस्ट हेल्मी हिने सांगितले आहे. हेल्मीने सांगितले की, तिला अस्वच्छ अन्न-पाणी दिले जायचे, तसेच त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत पुरवली जायची नाही. ग्रेटाला मारहाण करुन इतर लोकांना घाबरवले जायचे.
द गार्डियनने दिलेल्या अहवालानुसार, स्वीडीश परराष्ट्र मंत्रालयाने या संबंधी अधिकृत निवदेन जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, ग्रेटा इस्रायलच्या ताब्यात अत्यंत वाईट अवस्थेत होतीय तिला ढेकूणांनी भरलेल्या एका खोलीत ठेवण्यात आले होते. तिथे अन्न-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. तसेच मानवाधिकार संघटनांनी देखील इस्रायलने कैद्यांना वकील, वैद्यकीय सेवा आणि शौचालयाची सुविधाही दिली नव्हती असा आरोप केला आहे.
इस्रायलची प्रतिक्रिया
दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना इस्रायलने, हे सर्व आरोप निराधार असल्याचे आणि सर्व कार्यकर्ते सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, कार्यकर्ते जाणूनबुजून निर्वासन प्रक्रियेत अडथला आणत आहेत. दरम्यान यावर इटली आणि स्वीडिश सरकाने नागरिकांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे.
प्रश्न १. ग्रेटा थनबर्गला इस्रायलने का ताब्यात घेतले?
गाझाकडे निघालेल्या ग्लोबल फ्लोटिला मोहिमेत ग्रेटा थनबर्ग सहभागी झाली होती. यावेळी कोणालाही गाझात मदत घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. यामुळे इस्रायलने ताफा गाझा सीमेवर ग्रेटा थनबर्गसह या मोहिमेतील १७३ जणांना सुरक्षेच्या कारणास्त ताब्यात घेतले होते.
प्रश्न २. ग्रेटा थनबर्गसोबत इस्रायलच्या कोठडीत नेमकं काय घडलं?
थनबर्गसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, इस्रायली सैन्य ग्रेटा थनबर्गला क्रूर वागणूक देत आहेत. त्यांनी तिला केसांनी फरपटत नेले आणि इस्रायली झेंड्याला जबरदस्तीने चुंबन घेण्यास भाग पाडले. तसेच तिला एका अंधाऱ्या खोलीत बंद करण्यात आले आहे.
प्रश्न ३. ग्रेटा थनबर्गसोबत घडलेल्या अत्याचारावर इस्रायलने काय प्रतिक्रिया दिली?
इस्रायलने त्यांच्या सैन्यावर केलेल्या, ग्रेटा थनबर्गसोबतच्या अमानुष वागणूकीच्या आरोपांना नाकारले आहे.
प्रश्न ४. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेवर काय म्हटले जात आहे?
आंतरराष्ट्रीय स्तरावर इटली, आणि स्वीडिशसह अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच मानवाधिकार संघटनांनी ग्रेटा थनबर्गच्या प्रकणावर चौकशीची मागणी केली आहे.
नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार ; अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती, ४७ जणांचा मृत्यू