उद्घाटन समारंभाच्या आधी आयफेल टॉवरवरील ऑलिम्पिक रिंग्ससह पौर्णिमेच्या चंद्राचा एक मनमोहक व्हिडिओ आणि त्याची सुंदर छायाचित्रे देखील समोर आली आहेत. या व्हायरल फुटेजमध्ये पॅरिसच्या आयफेल टॉवरवर असलेल्या ऑलिम्पिक रिंग्समधील चंद्राचे हे दुर्मिळ आणि मोहक दृश्य कॅप्चर केलेले आहे.
ऑलिम्पिक २०२४ च्या आधी पॅरिसमधील लोकांना नुकतेच एक विलक्षण दृश्य पहायला मिळाले आहे. जेव्हा चंद्र आयफेल टॉवरवर प्रदर्शित झालेल्या ऑलिम्पिक रिंग्ससह पहायला मिळाला.
व्यावसायिक छायाचित्रकार आणि नेटिझन्स त्यांचे कॅमेरे काढून अचूक दृश्य टिपण्यात तत्पर होते. तेव्हापासून सोशल मीडियावर या दुर्मिळ दृश्याची मनमोहक छायाचित्रे व्हायरल होत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या फोटोजवर लाईक्स आणि हॅशटॅगचा पूर आला होता. जगभरातील लोकांनी त्यांचा आनंद आणि प्रशंसा केली आहे. अनेकांनी रात्रीचे आकाश आणि हा चमत्कार दोहोंच्या सौंदर्याबद्दल कौतुक व्यक्त केले.
पॅरिसमधील आयफेल टॉवरवर प्रदर्शित झालेल्या ऑलिम्पिक रिंग्सशी उत्तम प्रकारे संरेखित असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राच्या या विलक्षण दृश्यांनी या प्रेमाच्या शहरामध्ये एक आश्चर्यकारक आणि संस्मरणीय संध्याकाळ तयार केली.
पॅरिसमधील आयफेल टॉवरवर प्रदर्शित झालेल्या ऑलिम्पिक रिंग्सशी उत्तम प्रकारे संरेखित असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राच्या या विलक्षण दृश्यांनी या प्रेमाच्या शहरामध्ये एक आश्चर्यकारक आणि संस्मरणीय संध्याकाळ तयार केली.
पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये 206 देशांतील एकूण 10,500 खेळाडू भाग घेत आहेत. जे 35 ठिकाणी होणार आहेत. काही खेळ 24 जुलैला सुरू होतील. तर काही 25 जुलैपासून सुरू होणार आहेत.