राशी खन्ना ही एक बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्री असून, ती प्रामुख्याने तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम करताना दिसत असते. राशीने मद्रास कॅफे या हिंदी चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्री म्हणून या सिनेमासृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने अनेक हिंदी, तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम करून आपला दर्जा वाढवला. आता ती सतत तिच्या कामामुळे चर्चेत असते. चाहत्यांची नजर तिच्या चित्रपटाकडे आणि तिच्या व्हायरल फोटोजकडे लागलेले असतात. अशातच तिने आपले काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री राशी खन्ना ही नेहमी आपल्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो पोस्ट करताना दिसत असते. त्याचदरम्यान तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या भडक रंगाच्या ड्रेस मध्ये ती अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. तिचा हा लुक, मेकअप तसेच ड्रेसची स्टाईल पाहून चाहत्यांच्या नजर तिच्या कडून हाटतच नाही आहेत.
या ड्रेस वरील लुक परिपूर्ण करण्यासाठी तिने ड्रेसला मॅचिंग बांगड्या, झुम्मके आणि हातात भरीव अंगठी घातली आहे. याचबरोबर तिने या ड्रेसवरील लूकसाठी केसांची छोटी वेणी घालून केस मोकळे ठेवले आहेत. या मोकळ्या सोडलेल्या केसात ती अगदी रुबाबात आणि राणीसारखी दिसत आहे.
या दागिन्यांसह तिने या लूकसाठी रेखीव मेकअप परिधान केला आहे. तिने डार्क आयलायनर, जाड आयशॅडो, गुलाबी ब्लुश, जाड काजल आणि सोबतच लाल भडक लिपस्टिक लावली आहे. या सह तिने आपले सौंदर्या अजून दुप्पटपटीने खुलवले आहे.
राशी खन्ना ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून, ती नुकतीच योद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आणि तसेच ती अरमानाई ४ या तामिळ चित्रपटसुद्धा प्रेक्षकांना दिसली होती.