(फोटो सौजन्य – Pinterest)
खऱ्या काश्मिरी परंपरेचा सुगंध, थंडीच्या हवेत दरवळणारा कस्तुरीसारखा वेलदोड्याचा वास, आणि उकळत्या पाण्यात हळूच खुलणारे केशराचे कण हे सगळे एकत्र आले की तयार होतो काश्मिरी काहवा. उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये हा पेय फक्त गरम पाण्यात मिसळलेले मसाले नसून त्या प्रदेशाच्या आदरातिथ्याची, शांततेची आणि संस्कृतीची ओळख आहे. लांब हिवाळ्यात अंगात उब आणण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी, किंवा सकाळची सुरुवात सुखद करण्यासाठी काहवाचे स्थान विशेष मानले जाते. त्याचा सुवास इतका मोहक असतो की पहिला घोट घेताना जाणवणारी गोड उब ही जणू काश्मीरची हाकच असते.
Men’s Day 2025 : घरातील पुरुषांना करा खुश, खास दिनानिमित्त घरी बनवा युपीची फेमस डिश ‘दही के शोले’
थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसांत गरम गरम पेयांची मजा आपल्या शरीराला ऊबदार बनवते आणि मनालाही शांती देते. तुम्हाला जर चहा पिण्याची सवय असेल तर एकदा तरी तुम्ही काश्मिरी काहवाची चव चाखायला हवी. याची चव चहापेक्षा फार वेगळी असते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी काश्मीरी काहवा घरी तयार करण्याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. चला नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






