सकाळच्या नाश्त्यात नेहमीच ताज्या फळांचे सेवन करावे. फळे खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील अत्यंत महत्वाचे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात इतर कोणत्याही तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी डाळिंबाचे सेवन करावे. मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंब खाल्ले जाते. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात डाळिंब खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात नियमित करा डाळिंबाचे सेवन
उन्हाळ्यासह इतर दिवसांमध्ये शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी डाळिंबाचे दाणे किंवा डाळिंबाचा रस प्यावा. या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरातील दाह, ऍसिडिटी आणि पचनाची समस्या दूर होईल.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात डाळिंबाचे सेवन करावे. यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
डाळिंबामध्ये विटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी घटक आढळून येतात. विटामिन सी मुळे त्वचेचा रंग बदलण्यास मदत होते. याशिवाय त्वचेमधील जळजळ आणि रॅश कमी होतात.
डाळिंबाच्या दाण्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात आढळून येते. डाळिंब खाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित डाळिंब खावे.
डाळिंबामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. तसेच पांढऱ्या पेशी वाढवण्याचे काम डाळिंब करते. त्यामुळे तुम्ही डाळिंबाचा रस किंवा डाळिंबाचे दाणे खाऊ शकता.