उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण या दिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाणी कमी होते आणि थकवा, अशक्तपणा तर कधी चक्कर येऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरामध्ये थंडावा कायम टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. उष्णता वाढल्यानंतर पोटात जळजळ होणे, सतत अपचन, आंबट ढेकर किंवा उष्णतेमुळे पोटात जखमा सुद्धा होतात. त्यामुळे शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल. (फोटो सौजन्य – istock)
कडक उन्हाळ्यात नियमित करा 'या' पारंपरिक पदार्थांचे सेवन! शरीरात टिकून राहील थंडावा, दिवसभर राहाल फ्रेश

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणामध्ये कोणतेही तिखट पदार्थ न खाता दहीभात किंवा दूधभात खावा. यामुळे पोटात थंडावा वाढतो आणि अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते.

भाजलेल्या हरभऱ्यापासून तयार केलेले सातू पीठ एक ग्लास पाण्यात मिक्स करून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. सातूचे पिठात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि उष्णता कमी होते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी खाल्ल्यास फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. कारण काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. डिहायड्रेशन झाल्यानंतर काकडीचे सेवन करावे.

नाचणीचे आंबील किंवा नाचणीच्या पिठाची पेज उन्हाळ्यात आवर्जून खावी. पोटाला थंडावा देण्यासाठी आणि उन्हाळ्यात शरीर चांगले ठेवण्यासाठी नाचणीपासून बनवलेले पदार्थ खावेत.

सकाळच्या नाश्त्यात नियमित वाटीभर कलिंगड खाल्ल्यास पोट भरलेले राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.






