गुढीपाडव्याच्या निमित्ताने नालासोपारा पूर्व परिसरात जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानाच्या वतीने भव्य शोभयात्रा काढण्यात आली. या यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नालासोपारा पूर्वेतील तुलिंज येथील दत्त मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा संयुक्त नगर येथील दत्त मंदिराजवळ समाप्त झाली. या शोभयात्रेत सुमारे ८०० भाविकांनी सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे यामुळे ही शोभायात्रा विशेष आकर्षण ठरली.