भारतीय घरांमध्ये नेहमीच्या जेवणात आवर्जून डाळ भात बनवली जाते. डाळ भात हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय बऱ्याचदा आजारी पडल्यानंतर किंवा पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर डाळभात खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण डाळ भात पचायला अतिशय हलकी आहे. डाळ-भात हे पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटात डाळ भात हा पदार्थ असतोच. म्हणूनच आज आम्ही डाळ भात खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
पोषक घटकांनी समृद्ध असलेला डाळ भात आरोग्यासाठी आहे गुणकारी
डाळ बनवताना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा वापर केला जातो. मसूर डाळीमध्ये प्रथिने, फायबर, लोह, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. तर तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि ऊर्जा देणारे घटक असतात.
शरीरात वाढलेली ऍसिडिटी किंवा पचनसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डाळभात खाल्ली जाते.डाळीमध्ये असणारे फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. भात पचायला अतिशय हलका असतो.
भातामध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स शरीराला लगेच ऊर्जा देतात. त्यामुळे रोजच्या जेवणाच्या ताटात थोडासा तरी भात हा खाल्लाच जातो. मसूर डाळ आणि भात खाल्ल्याने शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.
वाढलेले वजन कमी करताना भाताचे सेवन केले जात नाही. पण पण वजन कमी करण्यासाठी भात डाळ खाणे हा उत्तम पर्याय आहे. भात डाळ खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
मसूरमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. भातामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.