नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा परिसरातील दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांनंतर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक शाळांमध्ये नवीन शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. काही शाळांमध्ये तर वर्ग बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत तातडीने पर्यायी शिक्षक नेमण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत शिक्षण विभागाशी चर्चा करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती लवकर न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अपरिहार्य असल्याचे पालक आणि स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.