अमरावतीत वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महावितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले असून मुख्य अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान शासनाच्या खासगीकरण धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.राज्य सरकारकडून वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतरही विविध मार्गांनी प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात खासगी कंपन्यांना समांतर वितरणाचा परवाना देणे, कंत्राटी पद्धतीने उपकेंद्रे चालविण्याचा निर्णय आणि प्रकल्प खासगी भांडवलदारांना देणे या मुद्द्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.कर्मचाऱ्यांनी शासनाकडे खासगीकरण तातडीने थांबवावे आणि निवृत्ती वेतन योजना तत्काळ लागू करावी, अशी मागणी केली आहे. या ठिय्या आंदोलनात शेकडो अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.