अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. तसेच आता अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर जास्त सक्रिय देखील असते. अश्यातच तिने सोशल मीडियावर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तसेच तिला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. आता सईचे हे फोटो आपण पाहणार आहोत.
सईच्या मनमोहक लुकने चाहत्यांच्या हृदयावर थेट वार (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सई ताम्हणकरने नुकतेच सोशल मीडियावर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि मोहक दिसत आहे.
सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये पोपटी रंगाची साडी नेसली आहे. ज्यावर सुंदर लांब हाताचा गुलाबी ब्लाउज घातला आहे. त्यावरील डिझाईन खूपच आकर्षित दिसत आहे.
तसेच, सईने या साडीवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे. ज्यामध्ये आयलायनर, मस्कारा, आयशॅडो आणि गुलाबी लिपस्टिकचा समावेश आहे.
सईने या सुंदर साडीवर कानात मॅचिंग असे इअरिंग्स देखील घातल्या आहेत. तसेच, तिने कपाळावर छोटी टिकली देखील लावली आहे.
अभिनेत्रीचा हा संपूर्ण देसी लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. आणि तिच्या प्रत्येक फोटोला त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.