Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब सध्या अमेरिकेत फिरतेय. शिवाली नेहमी तिच्या चाहत्यांसाठी काही ना काही हटके लूक सोशल मीडियावर पोस्ट करत असते.नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर अमेरिकेतील एका बागेतील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या व्हायरल होत असून चाहते तिच्याफोटोंवर खास कमेंट्स करताना दिसत आहेत. गुलाबी फ्लोरल वनपीस, केसांत पांढरी बो आणि ब्लॅक बूट्समधील तिचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.
गुलाबी फ्रॉकमध्ये शिवालीचा क्यूट लूक (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती सध्या अमेरिकेत फिरण्यासाठी गेली आहे. या ट्रीपदरम्यान ती तिथले सुंदर क्षण अनुभवताना दिसत आहे.

या फोटोमध्ये ती बागेतील एका बाकावर बसून हातात झाडाचे पान धरून पोज देताना दिसत आहे. या तिचा लूक नॅचरल आणि सिम्पल आकर्षक दिसत आहे.

तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने तिच्या या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा फ्लोरल वनपीस परिधान केलेला दिसत आहे. केसांत बांधलेली मोठी पांढरी बो आणि पायात ब्लॅक बूट्स अशा लूकमध्ये शिवाली क्यूट दिसत आहे.

अमेरिकच्या निसर्गरम्य वातावरणात शिवालीने खास फोटोशूट केले आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.






