टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने वयाच्या ४४ व्या वर्षीही तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने सर्वांना थक्क केले आहे. तिच्या फिटनेसपुढे २४ वर्षांच्या अभिनेत्रीही फिक्या वाटतात. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्यावर फिदा झाले आहेत.
श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज! (Photo Credit- Instagram)
निळ्या गाऊनमधील श्वेताचा बोल्ड लूक या फोटोंमध्ये श्वेताने निळ्या रंगाचा, स्किन-टाइट आणि हाय-स्लिट गाऊन घातला आहे. (Photo Credit - Instagram)
हा गाऊन खूप आकर्षक असून, त्यात श्वेता कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकला अजून खास करण्यासाठी तिने केस हलके कर्ल केले आहेत आणि मिनिमल मेकअप केला आहे. (Photo Credit - Instagram)
तिच्या या बोल्ड आणि क्लासी लूकमुळे तिचे चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. (Photo Credit - Instagram)
सोशल मीडियावर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले, "तिवारी जी... तुम्ही जबरदस्त आहात!" तर दुसऱ्याने, "तुम्ही या वयातही खूप तरुण दिसता!" असे म्हटले आहे. (Photo Credit - Instagram)