बदलत्या काळानुसार फॅशन, लाइफस्टईल, मेकअप इत्यादी अनेक गोष्टींमध्ये नवनवीन बदल होत आहेत. या बदलांकडे महिला जास्त आकर्षित झाल्या आहेत. हल्ली महिला साडी विकत घेतल्यानंतर ब्लाऊज शिवताना त्यावर स्टोन, डायमंड, थ्रेड वर्क, मोती वर्क इत्यादी वेगवेगळ्या डिझाइन्स करून घेतल्या जातात. मात्र बारीक नक्षीकाम किंवा हॅण्डमेड वर्क करून घेतलेले ब्लाऊज स्वच्छ करण्यासाठी ड्रायक्लिनिंग करणे हा एकमेव पर्याय असतो. पण ड्रायक्लिनिंग करताना सुद्धा ब्लाऊज खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डायमंड किंवा हेवी वर्क करून घेतलेले ब्लाऊज घरी स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही ब्लाऊज स्वच्छ करू शकता. यामुळे तुमच्या ब्लाऊजचे कोणतेच नुकसान होणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
डायमंड किंवा स्टोन वर्क केलेले महागडे ब्लाऊज स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स
नक्षीकाम, डायमंड किंवा थ्रेड वर्क करून घेतलेला ब्लाऊज वॉशिंग मशीनमध्ये धुवणे टाळावे. यासाठी उशी कव्हरचा वापर करा. उशी कव्हरमध्ये ब्लाऊज टाकून शॅम्पूच्या पाण्याने ब्लाऊज स्वच्छ करून घ्या.
स्वच्छ करून घेतलेला ब्लाऊज उन्हात सुकण्यासाठी ठेवू नये. यामुळे ब्लाऊजवरील वर्क खराब होऊ शकते. तुमचा महागडा ब्लाऊज वाया जाईल.
वेगवेगळे ब्लाऊज स्वच्छ करताना वेगवेगळ्या उशी कव्हरचा वापर करावा. जेणेकरून ब्लाऊजवरील डिझाईन खराब होणार नाही.
ब्लाऊज स्वच्छ करण्यासाठी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करू नये. याऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. पाण्याने ब्लाऊज धुतल्यानंतर पूर्णपणे सुकल्याशिवाय कपाटात ठेवू नये.
ब्लाऊज धुवताना नेहमी उलटा करून धुवावा. ब्लाऊजच्या बाहेरील बाजू आतमध्ये करून स्वच्छ करावी. तसेच ब्लाऊजमधील जास्तीचे पाणी शोषून घेण्यासाठी टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवावे.