How To Eat Dates: खजूर हे एक पौष्टिक फळ आहे, पण तुम्ही ते कसे खाता हे महत्त्वाचे आहे. दुधामध्ये भिजवलेल्या ओल्या आणि कोरड्या खजुरांमध्ये तुमच्या आरोग्यासाठी नक्की कोणते खजूर योग्य ठरते? अनेक वेळा खजूर भिजवून खावे की सुके खावे असा प्रश्न निर्माण होतो. मात्र आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. तुम्ही खजूर कशा पद्धतीने खावा आणि किती खावा हे जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
खजूर हे फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहेत, ज्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी खाणे हे आरोग्यासाठी उत्तम ठरते

वाळलेले खजूर आणि पाण्यात भिजवलेले खजूर दोन्ही आरोग्यासाठी पौष्टिक असू शकतात, परंतु या दोन्ही पद्धतीने खाण्यात काही फरक आहेत

सुक्या खजूरमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामध्ये सुमारे 66-80% विविध प्रकारचे कर्बोदके असतात. ते व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी सारख्या उर्जेचा आणि जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहेत

सुक्या खजूरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहासारखी खनिजे देखील असतात, जी आपल्या शरीरासाठी गरजेची आहेत

दुसऱ्या बाजूला ओल्या किंवा भिजवलेल्या खजूरमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे एकूण कर्बोदके आणि कॅलरीज सुक्या खजुरांपेक्षा कमी होतात

सुक्या खजुरांप्रमाणेच भिजवलेल्या खजूरमध्येदेखील व्हिटॅमिन ए, के, बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे पोषक तत्व आहेत

मात्र भिजवलेल्या खजुरामध्ये जास्त अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल असतात. याशिवाय ओले खजूर हे फायबरचे एक चांगले स्त्रोतदेखील आहेत

सुक्या आणि ओल्या खजुरांमधील निवड बहुतेकदा वैयक्तिक पसंती आणि ते कसे वापरावे यावर अवलंबून असते. निरोगी, संतुलित आहारामध्ये दोघांचाही समावेश केला जाऊ शकतो

ज्यांना त्यांच्या कॅलरी आणि कार्बोहायड्रेटचे सेवन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी सुका खजूर हा एक चांगला पर्याय असू शकतो. ज्यांना जास्त अँटिऑक्सिडंट्स आणि हायड्रेशन हवे आहे त्यांच्यासाठी ओले खजूर चांगले ठरतात

कोणत्याही प्रकारचे खजूर खाण्याआधी आपल्या शरीराला ते किती पचू शकतील याचा योग्य सल्ला डॉक्टरांकडून घेणे आवश्यक आहे, आम्ही कोणताही दावा करत नाही






