संग्रहित फोटो
पीएमपीकडून शहरातील महत्त्वाच्या बस थांब्यांवर तसेच गर्दीच्या ठिकाणी चेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे चेकर बसमधील प्रवाशांची तिकिटे तपासून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करीत आहेत. फुकट्या प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी पीएमपीकडून विशेष मोहीम नियमितपणे राबविली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसुली (एप्रिल–डिसेंबर 2025)
| महिना | दंड वसुली |
|---|---|
| एप्रिल २०२५ | ७,८२,००० |
| मे २०२५ | ७,८३,००० |
| जून २०२५ | ७,८०,००० |
| जुलै २०२५ | ११,२२,००० |
| ऑगस्ट २०२५ | १३,४९,५०० |
| सप्टेंबर २०२५ | १२,४९,५०० |
| ऑक्टोबर २०२५ | १२,६३,००० |
| नोव्हेंबर २०२५ | १५,९०,००० |
| डिसेंबर २०२५ | ११,९९,५०० |
“पीएमपीकडून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील असेच प्रवास दर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी सुरू असून, नागरिकांनी पीएमपी प्रशासनास सहकार्य करावे.” — किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी






