तुम्ही सुप्रसिद्ध मल्याळी फिल्म 'मंजुमेल बॉईज' हा चित्रपट जरूर पाहिला असेल किंवा या बद्दल ऐकलं असेल. या चित्रपटात सुभाष नावाचा व्यक्ती एका गुफेच्या दरीत जाऊन कोसळतो. नशीबाने त्याच्या मित्रांच्या सहाय्याने त्याचा जीव वाचतो. ज्या ठिकाणी ही घटना सत्यात घडली आहे, त्या जागेला एकेकाळी सैतानाचे किचन (Devil's Kitchen) म्हणून ओळखले जात होते.
'Devil's Kitchen' म्हणजे 'Guna Caves'बद्दल काही महत्वाचे फॅक्टस. (फोटो सौजन्य - Social Media)
Devil's Kitchen हे कोडईकनाल, तमिळनाडू येथे स्थित असून हे Bryant Park आणि Pillar Rocks च्या जवळील एक प्रसिद्ध गुहा स्थान आहे.
स्थानिक कथा सांगतात की पांडवांनी वनवासात या गुहांमध्ये काही काळ घालवला होता. 'Devil’s Kitchen' हे नाव गुहांतील गुंतागुंतीच्या रचनेमुळे तसेच येथे घडलेल्या भयाण घटनांमुळे पडले आहे.
या गुहा दोन उंच दगडी खांबांमध्ये खोल अंतरावर आहेत, जे पाहताना अतिशय थरारक वाटते. गुहा खोल असून अंधाऱ्या आणि ओलसर वातावरणामुळे या जागेला सैतानी समजले जाते.
हे ठिकाण हायकिंग व ट्रेकिंग साठी प्रसिद्ध आहे. मात्र, गुहांच्या अंधाऱ्या व अरुंद वाटा धोकादायक असल्यामुळे स्थानिक मार्गदर्शकासह जाणं शिफारस केलं जातं. Devil’s Kitchen हे एक निसर्गरम्य आणि थोडंसं रहस्यमय ठिकाण आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेलं आहे, विशेषतः थोडं हटके अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी.
कमळ हसन यांच्या सुप्रसिद्ध सिनेमा 'गुना'ची शूटिंग या ठिकाणावर झाली होती, तेव्हापासून या जागेला या सिनेमाच्या नावाने 'Guna Caves' म्हणून ओळखले जाते.