Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल
पर्यावरणाचा समतोल साधने खूप महत्वाचे आहे. ही गोष्ट जाणूनच जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या औचित्याने टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने भारतात पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक आरोग्याला चालना देण्यासाठी आपल्या दीर्घकालीन कटिबद्धतेची पुन्हा एकदा पुनःदृढता केली आहे.
२०१५ मध्ये सादर करण्यात आलेल्या ‘टोयोटा एन्व्हायर्नमेंट चॅलेंज 2050’ (TEC 2050) अंतर्गत सहा महत्त्वाच्या आव्हानांचा समावेश असून, टीईसी 2050 च्या मार्गदर्शनाखाली टीकेएम आपल्या कार्बन उत्सर्जनात सातत्याने घट करत आहे. हे प्रयत्न नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, कार्यक्षम प्रकल्प आणि सामाजिक प्रगतीला चालना देण्याच्या दिशेने केंद्रित आहेत.
जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणजे पर्यावरणाच्या गुणवत्तेचा आणि सार्वजनिक आरोग्यातील घट्ट संबंधाची जाणीव करून देणारा दिवस. स्वच्छ हवा, पाणी, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण यावर भर देत, हा दिवस पर्यावरणसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
Thalapathy Vijay च्या ताफ्यात एकापेक्षा एक Luxury Cars चा समावेश, किंमत तर विचारूच नका
टीकेएमच्या विविध शाश्वत उपक्रमांद्वारे केवळ कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि संसाधनांची बचत एवढ्यापुरतेच नव्हे, तर आरोग्यदायी समुदाय घडवण्यावरही भर दिला जातो.
‘Respect for the Planet’ (पर्यावरणाचा आदर) या तत्त्वाशी बांधील राहत, टीकेएमने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये, उत्पादन प्रक्रियेत आणि सामाजिक सहभाग उपक्रमांमध्ये नाविन्य आणि सकारात्मक विकास उद्दिष्टांचा समावेश केला आहे. यामुळे अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन परिणाम साध्य होऊ शकतात.
टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि संचालक बी. पद्मनाभ म्हणाले, “टीकेएममध्ये शाश्वतता हा आमच्या कार्यपद्धती, नाविन्यतेचा आधार आणि विकासाचा मूलभूत पाया आहे. मागील वर्षभरात आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये निर्णायक प्रगती केली आहे. बिदादी येथील आमच्या उत्पादन केंद्रात 100% नवीकरणीय ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. आमच्या प्रयत्नांमुळे आणि समाजाच्या दूरवर पोहोचणाऱ्या उपक्रमांमुळे आम्ही लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.”
GST 2.0 चा कमाल! TVS Apache ची धाबे दणाणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त
टीकेएम 2035 पर्यंत आपल्या उत्पादन प्रक्रियांमध्ये नेट-झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. याचबरोबर 2050 पर्यंत संपूर्ण मूल्यसाखळीमध्ये नेट-झिरो उत्सर्जन साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.
कंपनीचा बहुआयामी दृष्टिकोन इलेक्ट्रिफाइड वाहन तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर आधारित असून, भारतातील ऊर्जा गरजांशी सुसंगत अशा हायब्रिड इलेक्ट्रिक, प्लग-इन हायब्रिड, फ्युएल सेल इलेक्ट्रिक आणि बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांची उभारणी केली जात आहे.
2023 मध्ये, टीकेएमने ‘इनोव्हा हायक्रॉस’वर आधारित जगातील पहिल्या BS6 (Stage 2) इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स फ्युएल वाहनाचा प्रोटोटाइप सादर केला. भारताच्या जैवइंधन ध्येयांशी सुसंगत, कमी उत्सर्जन आणि सुधारित कार्यक्षमतेसाठी हे वाहन डिझाइन करण्यात आले आहे.