उन्हाळ्याच्या दिवसांत एसी, पंख्यासोबतच फ्रीजचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. थंड पाणी, बर्फ, ताजी फळे आणि भाज्या आणि उरलेले अन्न साठवण्यासाठी चांगल्या रेफ्रिजरेटरची गरज प्रत्येकाला वाटते. उन्हाळ्यात अनेकजण नवीन फ्रीज खरेदी करतात मात्र त्या फ्रीजचा रिव्ह्यु तपासत नाहीत. मात्र फ्रीज खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: फ्रीज खरेदी करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर
रेफ्रिजरेटर खरेदी करताना, तुमच्या घरात राहणाऱ्या लोकांची संख्या विचारात घ्या. चुकीच्या क्षमतेचा रेफ्रिजरेटर केवळ जागा अडवत नाही तर वीज वापर देखील वाढवतो.
इन्व्हर्टर कंप्रेसर असलेले रेफ्रिजरेटर कमी वीज वापरतात आणि जास्त काळ टिकतात.
ज्यांना बर्फाची आवश्यकता नसते अशा लोकांसाठी फ्रॉस्ट फ्री फ्रीज खरेदी करणं उत्तम पर्याय आहे.
रेफ्रिजरेटरची कूलिंग कार्यक्षमता चांगली असावी, जेणेकरून अन्न जास्त काळ ताजे राहील.
एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, गोदरेज आणि हायर सारख्या ब्रँड्सकडे चांगले सेवा नेटवर्क आहे आणि त्यांची उत्पादने विश्वासार्ह आहेत.