(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी आज कोणत्याही परिचयाची गरज नसलेल्या नामवंत कलाकारांपैकी एक आहे. ४ ऑक्टोबर रोजी ती आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे.पण तिच्याकडे पाहून असे कोणालाच वाटणार नाही की ४५ वर्षांची आहे. तिचे फिटनेस आणि सौंदर्य पाहून ती नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करत असते. या वयातही श्वेता पूर्णपणे तंदुरूस्त आहे. श्वेताने टीव्हीवर तसेच सिनेमात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
श्वेताने आपल्या करिअरची सुरुवात १९९९ मध्ये आलेल्या मालिकेने ‘कलीरे’ मध्ये केली होती. पण त्यानंतर आलेल्या मालिकेने ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये ‘प्रेरणा’ची भूमिका साकारून ती घराघरांत पोहोचली. प्रेरणा-अनुरागची जोडी आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे.
पहिल्या मालिकेचं शूटिंग अगदी ७२ तास सलग होत असे आणि पेमेंट मिळायला ४५ दिवस किंवा त्याहूनही जास्त वेळ लागत असल्याचे श्वेताने सांगितलं होतं. श्वेताने १२ वर्षांची असतानाच काम करायला सुरूवात केली. तिने एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करून कुटुंबाला आधार दिला. तिची पहिली कमाई फक्त ५०० रुपये होती.
Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक
श्वेताचा वैयक्तिक जीवनही संघर्षांनी भरलेला आहे. १८ वर्षांच्या वयात तीने भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी पलक झाली. पण नंतर ते वेगळे झालं. यानंतर श्वेताने अभिनेते अभिनव कोहलीशी लग्न केले आणि त्यांना मुलगा रेयांश झाला, पण हे लग्नही दीर्घकाळ टिकले नाही व तीन वर्षांनंतर त्यांचा डिव्होर्स झाला.श्वेता तिवारीचा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला असून, तिच्या मेहनतीमुळे आज ती एक यशस्वी आणि प्रेरणादायी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर
टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर, श्वेता बिग बॉस ४ मध्ये दिसली. श्वेताने रिअॅलिटी शोमध्ये स्वतःची एक वेगळी बाजू उघड केली. तिच्या व्यक्तिमत्त्वाने सर्वांना आश्चर्यचकित केले. घरात तिचे डॉली बिंद्रासोबत मोठे भांडणही झाले. त्या प्रत्येक भांडणासह तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान अधिक मजबूत होत केले. शिवाय, ती शोची विजेती ठरली.