'RRR' मधील 'नाटू नाटू' या गाण्यामुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेल्या टॉलिवूड अभिनेता ज्युनियर एनटीआरचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्याचा जन्म २० मे १९८३ रोजी हैदराबादमध्ये झाला आहे. ज्युनिअर एनटीआरचा जन्म एका रॉयल घराण्यात झाला आहे. ज्येष्ठ तेलुगू अभिनेते, चित्रपट निर्माते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रावाराव यांचा अभिनेता नातू आहे. तर, चित्रपट अभिनेता आणि राजकारणी नंदमुरी हरिकृष्णा यांचा तो मुलगा आहे. कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्यातच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया...
Actor Junior NTR Birthday
टॉलिवूड सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) फक्त भारतातच नाही तर, जगभरात आजच्या घडीला तो लोकप्रिय आहे. एनटीआरचे केवळ देशातच नाही तर जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव नंदमुरी तारक रामाराव ज्युनिअर असं आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर साऊथ सुपरस्टारने प्रेक्षकांची मने जिंकली.
फोर्ब्स मॅगझिनच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ज्युनिअर एनटीआर २८ व्या स्थानावर असून त्याची संपत्ती भारतीय चलनाप्रमाणे जवळपास ५०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. तर परदेशी चलनाप्रमाणे अभिनेत्याची ६० दशलक्ष डॉलर्स इतकी संपत्ती आहे. कमाईमध्ये त्यानं अनेक सेलिब्रिटींना मागं टाकलं आहे. ज्युनिअर एनटीआर एका सिनेमासाठी १८ ते २० कोटी मानधन घेतो.
आपल्या अनेक चित्रपटांसाठी नंदी ॲवार्ड, आयफा ॲवार्ड, फिल्मफेअर बेस्ट तेलुगू ॲवार्डवर नाव कोरणारा ज्युनिअर एनटीआरची लाइफस्टाइलही अगदी खास आहे. पत्नी लक्ष्मी प्रणिती, आणि मुलं अभय राम, भार्गवी राम यांच्यासोबत तो छान आयुष्य जगत आहे. हैदराबाद, बंगळुरू यांसह कर्नाटकात अभिनेत्याचे आलिशान घर आणि फार्महाउस आहेत.
सुपरहिट आणि दमदार चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा एनटीआर खासगी आयुष्यात अगदी अलिशान जीवन जगतो. हैदराबादच्या प्राईम लोकेशनमध्ये त्याचा एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत २५ कोटींच्या घरात आहे. ज्युनियर एनटीआर हैदराबादच्या जुबली हिल्समधील एका आलिशान घरात आपल्या कुटुंबासह राहतो. या घरात सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्युनियर एनटीआर प्रत्येक महिन्याला सुमारे ३ कोटी रुपये आणि वार्षिक ३६ कोटी रुपयांची कमाई करतो. एका चित्रपटासाठी अभिनेता ४० ते ६० कोटी रुपये इतकी रक्कम घेतो. तर एका जाहिरातीसाठी एनटीआर १० ते १५ कोटींच्या आसपास फी घेतो. अभिनेता चित्रपटासोबतच जाहिरात आणि गुंतवणूकीच्या माध्यमातूनही पैसे कमावतोय.
ज्युनियर NTR कडे लक्झरी वाहनांचे चांगले कलेक्शन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये रोल्स रेंज रोव्हरसारख्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. शिवाय, रेंज रोवर वोग, बीएमडब्लयू 720 एलडी अशा अनेक प्रकारच्या गाड्या आहेत.