बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा शरीरावर देखील होतो. खरंत आजच्या धावपळीच्या आयुष्यात बाहेरंच खाणं खूप जास्त होत असतं. त्यामुळे या बाहेरच्या खाण्याने पोट भरतं खरं पण शरीराला पोषक घटक मिळत नाही. फक्त पोटं खाणं म्हणजे शरीराची काळजी घेणं नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी असलेले पोषक घटक देखील महत्वाचे असतात. हेच पोषक घटक मिळणं कमी झालं की अनेक व्हिटामीनची कमतरता शरीरात निर्माण होते. याचशिवाय सर्वात मोठी समस्या म्हणजे रक्ताची कमतरता.
हल्लीच्या काळात एखाद्या व्यक्तीचं वजन जरी नियंत्रित असलं तरी त्याला रक्ताची कमतरता जाणवते. एखादी व्यक्ती आजारी दिसत नसली तरी अनेकजण असे आहेत ज्यांना रक्त कमी असतं,याला अनेक कारणं देखील आहेत. महिलांना अनियमित मासिकपाळीमुळे रक्तााची कमतरता जाणवते. अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे देखील हा त्रास जाणवतो. सर्वसाधारण मुत्रविकार किंवा काही आनुवंशिक आजारांमुळे देखील रक्त कमी होतं. त्याचबरोबर व्हिटामीन B12 ची कमरता रक्त कमी असण्याचं कारण आहे.
जर तुम्हालाही रक्त कमी असेल आणि हिमोग्लोबीन वाढवायचं असल्यास हिरव्या पालेभाज्या खाणं फायदेशीर ठरतं. पालेभाज्या हा लोहाचा उत्तम स्रोत आहे. पालक, मेथी, शेवगा पानं, चाकवत या पालेभाज्यांमध्ये आयरन, फॉलिक अॅसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. या भाज्या दैनंदिन आहारात सामील केल्यास रक्तवाढीस मदत होते.तसेच डाळी आणि कडधान्यं जसे की मूग, मसूर, हरभरा, राजमा, चणे हे रक्तवाढीसाठी महत्त्वाचे आहेत. यात लोहाबरोबरच प्रोटीनही भरपूर असते. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मुख्य स्रोत हेच असल्याने ते नियमित खाल्ले पाहिजेत.
याचबोरबर सुकामेवा देखील रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. खजूर, काळे मनुके, अंजीर, हे सर्व पदार्थ लोहयुक्त असतात. दिवसभरातील मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून किंवा दुधात घालून यांचे सेवन केल्यास रक्त वाढण्यास मदत होते.याशिवाय धान्यं जसे की नाचणी, बाजरी, ज्वारी यामध्ये भरपूर लोह असते. गव्हाच्या तुलनेत ही धान्यं अधिक पौष्टिक ठरतात. नाचणीच्या साते, भाकरी किंवा लाडू हे उत्तम पर्याय आहेत.फळं यामध्ये डाळिंब, सफरचंद, संत्रं, पेरू, कीवी, स्ट्रॉबेरी, आवळा ही फळं रक्तवाढीसाठी उपयुक्त आहेत. विशेषतः संत्रं, पेरू, आवळा यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असतं ज्यामुळे लोह वाढण्यास मदत होते. त्यामुळे आयरनयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन C असलेली फळं खाणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गूळ देखील रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. गुळामध्ये लोहाबरोबरच इतर खनिजं असतात. गूळ-शेंगदाणा, गूळ-तिळाचे लाडू हे रक्तवाढीस मदत करणारे पदार्थ आहेत.