स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी आणि लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. ज्ञानदाचे तिचा मित्र फोटोग्राफर हर्षद गायकवाड याच्याशी लग्नगाठ बांधली. पुण्यात पारंपरिक पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला. याचे काही फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा नुकताच थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.

या विवाह सोहळ्यात तिने पारंपरिक मराठमोळा लुक केला होता.

ज्ञानदाने लग्नात विधींच्या वेळी वांगी कलरची साडी नेसली होती. तिच्या साडीला सोनेरी रंगाची जर होती.

गळ्यात तन्मणी, कमरेला छल्ला, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर तिच्या या लुकवर चाहते फिदा झालेत.

याचा लग्नसंमारंभाचा मंडप देखील तितकाच आकर्षक होता.






