हल्ली जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत.त्यात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. फॅटी लिव्हरमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. लठ्ठपणा, मद्यपान, धूम्रपान आणि शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय झाल्यानंतर फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या मुळांपासून नष्ट करण्यासाठी कोणत्या पेयांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे लिव्हरमध्ये साचलेली घाण नष्ट होईल. (फोटो सौजन्य – istock)
लिव्हरमध्ये साचलेली घाण मुळांपासून होईल स्वच्छ! रोजच्या आहारात करा 'या' पेयांचे सेवन
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ग्रीन टी चे सेवन करावे.
विटामिन सी युक्त आवळ्याचा रस आरोग्यासाठी प्रभावी आहे. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे लिव्हरमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित ताज्या आवळ्याचा रस प्यावा.
लिंबू पाण्यात असलेले सायट्रिक ऍसिड शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. याशिवाय नियमित लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीराची पीएच पातळी संतुलित राहते.
बीटच्या रसात बीटालाइन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळून येते, ज्यामुळे लिव्हर मुळांपासून स्वच्छ होते. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीर स्वच्छ होईल आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल.
मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा वापर त्वचा आणि शरीरासाठी केला जात आहे. यामध्ये असलेले घाण शरीरासाठी आवश्यक ठरतात. लिव्हरमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोरफडचा रस प्यावा.